दांडगाई करून पाण्यासाठी राजकारण करू नये

0
90

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील; थोरात यांचे नाव न घेता घेतला खरपुस समाचार

आश्वी : ज्यांना जनतेने नाकारले ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी दांडगाई करून पाण्यासाठी राजकारण करीत आहे. परंतू तुम्ही या भानगडीत पडू नका, राज्यात महायुतीचे सरकार आहे. पाण्याच्या प्रश्नात आम्हाला राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांना कोणी वेठीस धरत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाला अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता दिला.


गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या भंडारदार प्रकल्पाच्या प्रवरा डावा व उजवा कालव्यावरील वॉटर केर्स पुनस्थापना व नुतनीकरणाच्या भूमपूजन समारंभ प्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, संचालक विजयराव म्हसे, अॅड अनिल भोसले, रंगनाथ उबेरकर, सुनिल तांबे, गोरक्षनाथ तांबे, आर. डी. कदम, सरूनाथ उंबरकर, विजयराव चतुरे, बँकेचे संचालक अजय ब्राम्हणे, संजय गांधी, प्रवरा शिक्षण संस्थेचे संचलाक आण्णासाहेब भोसले उपस्थित होते.


ना. विखे पाटील म्हणाले की, पाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेल्या जुन्या ब्रिटीश कालीन योजना सक्षम करण्याचे धोरण विभागाने हाती घेतले असून, लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळाले पाहीजे हीच भूमिका आहे. मात्र ज्यांना जनतेने नाकारले तेव आता स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी पाण्यासाठी राजकारण करून दांडगाई करीत आहेत. मात्र शेवटच्या भागातील शेतकऱ्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर, आम्ही सहन करणार नाही. लाभक्षेत्रातील शेतकर्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यापूर्वी कालव्याच्या कामांना कधीही निधी मिळाला नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कालव्याचे नूतनीकरण होत असून जुन्या पारंपरिक सिंचन व्यवस्था या माध्यमातून अधिक सक्षम होतील, असा विश्वास विखे यांन व्यक्त केला.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. यासाठी पायाभूत सिंचन व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे. भंडारदरा धरणामध्ये अधिकचे पाणी निर्माण करणे आणि पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वळविण्यासाठी विभागाने प्रयत्न सुरू केले असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम महायुती सरकारने पूर्ण केले. यंदाच्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळावे म्हणून चांगले नियोजन विभागाने केले. आणखी एखादे आवर्तन होईल, असा प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here