दिल्ली : पाकिस्तानातील आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने काल रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार हल्ले केले. पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ही प्रत्युत्तरात्मक कारवाई करत पाकिस्तानला ठोस संदेश दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये काल दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या केली. धर्म विचारून लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. यानंतर भारत सरकारने रातोरात मोठा निर्णय घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं.
ऑपरेशन सिंदूर: थरारक कारवाईचे क्षणोक्षणी अपडेट
रात्री 1:47 – पीओकेमधील मुझफ्फराबादजवळ जोरदार स्फोट; विजेचा पुरवठा खंडित.
1:51 – भारताचे सुरक्षा दल पाक व पीओकेतील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला सुरू करतात.
2:10 – भारत सरकारकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची अधिकृत घोषणा.
2:17 – पाक लष्कराचे दावे: कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादवर क्षेपणास्त्र हल्ले.
4:13 – लष्कर, नौदल, आणि हवाई दलाने संयुक्त कारवाई; प्रिसिजन अटॅक तंत्रज्ञानाचा वापर.
4:32 – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पाक अधिकाऱ्यांशी संपर्कात.
4:35 – पाकिस्तानला जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स रद्द.
5:04 – ९ लक्ष्यांपैकी ४ पाकिस्तानात आणि ५ पीओकेमध्ये; बहावलपूर, मुरीदके, सियालकोट हल्ल्याचे प्रमुख केंद्र.
5:27 – अमेरिका: भारत-पाक तणावावर लक्ष ठेवत असल्याचे विधान.
5:45 – कतार एअरवेजने पाकिस्तानातील उड्डाणे रद्द केली.
6:00 – पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदी कराराचा भंग; पूंछ-राजौरीमध्ये गोळीबार.
6:08 – भारतीय लढाऊ विमानं सुरक्षित परतली.
6:14 – पाकिस्तानने हवाई हद्द पूर्णतः बंद केली.
भारताचा ठोस संदेश!
या कारवाईत ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून भारताने स्पष्टपणे दाखवून दिलं की, दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी देश कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे.
आज सकाळी 10 वाजता लष्कराची पत्रकार परिषद
भारतीय लष्कर आज सकाळी १० वाजता या ऑपरेशनविषयी अधिकृत माहिती पत्रकार परिषदेत देणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष सध्या या निवेदनाकडे लागले आहे.








