धांदरफळ वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ, शेतकऱ्यांसाठी नवा ट्रान्सफॉर्मर सुरू

0
38

आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून ५ एमव्हीए वरून १० एमव्हीए अशी दुप्पट क्षमता वाढ

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून ५ एमव्हीएवरून ती १० एमव्हीए करण्यात आली आहे. या परिसरातील विजेचा प्रश्न लक्षात घेता तात्काळ स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या नवीन ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ करून कार्यान्वित करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ परिसरात वाढत्या वीज मागणीमुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाचा प्रश्न गंभीर झाला होता. याचा सर्वाधिक फटका या परिसरातील शेतकऱ्यांना बसत होता. तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिके धोक्यात आली होती.

दरम्यान शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे आता धांदरफळ व परिसरातील गावांना वीज पुरवठा सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने होणार आहे.

बसविण्यात आलेल्या नवीन ट्रांसफार्मरमुळे वीज खंडित न होता पूर्ण दाबाने पुरवठा होण्यास मदत होणार असल्याची भावना मिलिंद खताळ, उमेश कोकणे, बाळासाहेब खताळ, अमोल खताळ, सुरज खताळ, पियुष ठोंबरे, सर्वेश गुंजाळ, विकास खताळ यांच्यासह स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

तत्परतेने उपकेंद्रातील वीज ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेत वाढ केल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांचे धांदरफळ व परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच हा वीजेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी धांदरफळ वीज उपकेंद्राचे महादेव गुरसाळी, सचिन गभणे, कैलास कुदळ, अनिल डुबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here