अहिल्यानगरमध्ये धार्मिक वाद! रोडवर मुस्लिम धर्मगुरूचं नाव लिहिल्याने दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

0
36

अहिल्यानगर : जिल्ह्यातील कोटला गावात आज (सोमवारी) सकाळी दुर्गा माता मिरवणुकीदरम्यान दोन समाजगटांमध्ये निर्माण झालेल्या वादाने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेत काही आंदोलक जखमी झाले असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

नेमके काय घडले?
मुस्लीम धर्मगुरुच्या नावाची रांगोळी काढून त्यांची विटंबना करण्याता आल्याच्या प्रकारावरून हा तणाव निर्माण झाला. विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर आले. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत होतं. कायदा-सुव्यवस्था बिघडेल असं वागू नका, शांततेत निघून जा. तुम्ही आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही, तर पोलीस योग्य पावल उचलतील अशी माईकवरुन घोषणा केली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here