उंबरी बाळापूर शिवारात चारचाकींचा अपघात, ७५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू

0
49

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात सोमवारी झालेल्या चारचाकी वाहनांच्या अपघातात आश्‍वी खुर्द येथील विकास साहेबराव गायकवाड हे जखमी झाले असून भास्कर बबन मांढरे यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मनोलीमार्गे संगमनेरच्या दिशेने जात असताना, मनोली रस्त्यावर अरगडे आणि भुसाळ वस्तीलगत त्यांच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने हूल दिल्याने हा अपघात झाला.

सोमवार दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आश्‍वी खुर्द येथील रहिवासी असलेले विकास साहेबराव गायकवाड आणि भास्कर बबन मांढरे (वय – ७५) हे चारचाकी वाहनातून मनोलीमार्गे संगमनेरच्या दिशेने चालले होते. मानोली रोडवरील अरगडे आणि भुसाळ वस्तीजवळ दुसऱ्या वाहनाने वळण घेतल्याने हा अपघात झाला, ज्यामुळे मांढरे आणि गायकवाड यांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की आवाज ऐकताच आजूबाजूच्या वस्त्यांमधील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोन्ही जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात हलवले. धडकेनंतर वाहनाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता. जखमींना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here