राहाता बाजार समितीत डाळिंबाला तब्बल २०५ रुपयांचा उच्चांकी भाव; वाचा गहु, ज्वारी, सोयाबीन, पेरू आणि सीताफळाचे भाव

0
48

राहाता : राहाता बाजार समितीत बुधवारी डाळिंबाला प्रति किलो सर्वाधिक २०५ रुपये भाव मिळाला. बाजार समितीत डाळिंबाची एकूण ९२९० कॅरेट आवक झाली. त्यात डाळिंब नंबर-१ ला १४१ ते २०५ रुपये, नंबर-२ ला ९१ ते १४० रुपये, नंबर-३ ला ४१ ते ९० रुपये तर नंबर-४ ला १० ते ४० रुपये असा दर मिळाल्याची माहिती देण्यात आली.

धान्य बाजारात गव्हाला सरासरी २५०० रुपये, सोयाबीनला ४३१५ रुपये आणि ज्वारीला सरासरी २०६५ रुपये भाव मिळाला. यावेळी ज्वारीची २ क्विंटल आवक झाली.

फळबाजारात पेरूची १४ कॅरेट आवक झाली असून त्याला सरासरी १५ रुपये दर मिळाला. सीताफळाला १० ते ७५ रुपये असा दर मिळून सरासरी ५० रुपये भाव झाला.

ही माहिती राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here