माजी आ. अरुणकाका जगताप काळाच्या पडद्याआड

0
106

अहिल्यानगर : पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी आ. अरुणकाका बलभिमराव जगताप यांचे काल पहाटे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्यापासून उपचार सुरू होते. ते आ. संग्राम जगताप यांचे वडील होते.

अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात जगताप यांचा मोठा प्रभाव होता. ते अहिल्यानगर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी दोनदा विधान परिषदेवर प्रतिनिधित्व केले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

आ. शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे ते व्याही होते. अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अरुण राजकीय जगताप यांची कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here