मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरु केलेली एक महत्वाकांक्षी योजना असून राज्यातील लाखो महिलांना याचा थेट लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात जमा होतात. मात्र आता या योजनेबाबत एक नवा अपडेट समोर आला आहे – काही महिलांच्या खात्यात थेट ४,५०० रुपये जमा होणार आहेत!
आतापर्यंतचा लाभ
या योजनेचा लाभ जुलै २०२४ पासून सुरु झाला असून, आजवर जुलै ते एप्रिल या १० महिन्यांचे हफ्ते पात्र महिलांना मिळाले आहेत.
विशेष म्हणजे ८ मार्च २०२५ रोजी (जागतिक महिला दिन) फेब्रुवारी व मार्च २०२५ हफ्त्यांचा एकत्रित लाभ (३००० रुपये) अनेक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
कोणाला मिळणार ४,५०० रुपये?
मिळालेल्या माहितीनुसार, काही पात्र महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ त्यावेळी मिळाला नव्हता. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत या महिलांना एकूण ४,५०० रुपये मिळणार आहेत.
दोन मे २०२५ पासून ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून याबाबतची प्रक्रिया वेगात सुरू आहे.
काही महिलांना मात्र फक्त ५०० रुपयेच?
होय, काही पात्र महिलांच्या खात्यात फक्त ५०० रुपयेच जमा होणार आहेत. कारण या महिलांना आधीच पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना कमी लाभाचे निकष लागू होतात.








