अकोलेत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
156

अकोले : सोशल मीडियावर चुकीच्या पध्दतीने पोस्ट करणे एकाच्या चांगलच अंगलट आले. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने अकोले तालुक्यातील कोतूळ येथे एकाने समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अकोले पोलिसांत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

सलीम लतीफ शेख (रा. कोतूळ) या तरुणाने अहिल्यानगरचे नाव खोडून सदर ठिकाणी ‘बापाचे नाव बदलल्याने बाप बदलणार नाही’ अशी पोस्ट केली होती. त्यानंतर परत पुन्हा त्याच अकाउंटवरून ‘अखंड हिंदुस्तानचा बाप एकच बादशाह औरंगजेब’ अशी कमेंट करून सर्व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत विनोद अशोक देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सलीम शेख याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे करीत आहेत.

अकोले पोलिसांनी समाजात तणाव निर्माण होऊ नये म्हणून वेळीच पावले उचलत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच धार्मिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here