पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे शिर्डीमार्गे की संगमनेरमार्गे जाणार? नवा डीपीआर झाला तयार

0
57

संगमनेर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे. यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, प्रकल्पासाठीचा सुधारित डीपीआर तयार करण्यात आला असून हा डीपीआर मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर होणार आहे. मध्य रेल्वेने या रेल्वे मार्गाबाबतचा सविस्तर डीपीआर पूर्ण केला असून तो अंतिम टप्प्यात आहे. काही त्रुटी दूर झाल्यानंतर लवकरच तो मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे जाणार आहे.

कसा आहे नवा DPR?

नव्या डीपीआरनुसार रेल्वे मार्ग पुणे – अहिल्यानगर – शिर्डी – नाशिक असा राहणार आहे. या नव्या रेल्वे लाईनची एकूण लांबी 235 किलोमीटर इतकी असेल. सध्याच्या पुणे- अहिल्यानगर महामार्गाला समांतर रेल्वे लाईन ठेवण्यात आली आहे. पुणे ते अहिल्यानगर अंतर 125 किलोमीटरचे राहणार असून शिर्डी ते नाशिक यादरम्यानच्या रेल्वे लाईनसाठी नवा रूट निश्चित होऊन ते अंतर एकूण 82 किलोमीटरचे राहील.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग प्रति तास २०० किलोमीटर वेगाने धावण्यासाठी सक्षम असेल. प्रकल्पाची अंमलबजावणी साडेतीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण २४ स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गामुळे पुणे, अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिक या महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे. तसेचं नवीन मार्गिकेमुळे पुणे-नाशिक पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here