शिर्डीतील ‘ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट’ घोटाळ्याची व्याप्ती वाढली, नागरिकांना कोट्यवधींचा गंडा

0
39

शिर्डी : शिर्डीतील ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स घोटाळ्याचा पसारा वाढत चालला आहे. ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स विरोधात शिर्डी, राहाता नंदुरबार येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक परताव्याचं अमिष दाखवत गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

मास्टरमाईंट भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ भूपेंद्र पाटील याच्यासह त्याचे वडील आणि इतरावंर शिर्डी आणि राहाता पोलीसात भारतीय न्याय संहिता 318(4) ,316(2), 3(5) आणि महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम (1999) च्या 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणात आतापर्यंत पावने दोन कोटींची फसवणूक झालेले 22 गुंतवणूकदार समोर आले आहेत. शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार अशा अनेक ठिकाणी अधिक परतावा देण्याचं आमिष देत नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींनी सुरुवातीला काही महिन्यांचे हप्ते वेळेवर देऊन विश्वास निर्माण केला. मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रलोभन दिले. त्यानंतर अचानक शिर्डीतील कार्यालय बंद, फोन बंद आणि आरोपी कुटुंबासह फरार झाले. ⁠महागड्या गाड्या आणि हायफाय राहणीमान, अधिकचा खर्च करत गुंतवणूकदारांना भूरळ पाडल्याचा फंडा या घोटाळ्यात वापरण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here