गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रीसाई चरणी ६ कोटी ३१ लाखांची ‘गुरूदक्षिणा’; तीन दिवसांत तीन लाखांपेक्षा जास्त भाविक दर्शनाला

0
43

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने ९ ते ११ जुलै दरम्यान पार पडलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवात भाविकांनी श्रीसाई चरणी भरभरून गुरुदक्षिणा अर्पण करत तब्बल ६ कोटी ३१ लाखांहून अधिक रकमेची देणगी दिली. या उत्सवात देशभरातून आलेल्या तीन लाखांहून अधिक साईभक्तांनी समाधी मंदिरात साइंचे दर्शन घेतले.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सव काळात विविध स्रोतांतून मिळालेली देणगी ६ कोटी ३१ हजार ३६२ इतकी आहे. यात दक्षिणा पेटीतील रोख स्वरूपात १ कोटी ८८ लाख, देणगी काउंटरवरून १ कोटी १७ लाख, ऑनलाइन, चेक-डीडी, मनीऑर्डर, कार्ड आणि यूपीआयमधून २ कोटी ५ लाखांची देणगी समाविष्ट आहे. तसेच भाविकांनी ६६८ ग्रॅम सोनं (रु. ५७.८७ लाख) आणि सुमारे ६,८०० ग्रॅम चांदी (रु. ५.८५ लाख) साई चरणी अर्पण केली.

६४ लाख रुपयांचे उत्पन्न लाडू प्रसाद विक्रीतून मिळाले
संस्थानच्या साई प्रसादालयात १ लाख ८३ हजारांहून अधिक भाविकांनी प्रसाद भोजन केलं, तर दर्शन रांगेत १ लाख ७७ हजारांहून अधिक भाविकांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवात लाडू प्रसादाच्या विक्रीतून ६४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हजारो साईभक्तांनी साईप्रसाद निवास, साईआश्रम, साई धर्मशाळा यासह मंडपांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या अतिरिक्त निवास व्यवस्थांचा लाभसाईभक्त निवास, द्वारावती, घेतला. तसेच देशभरातून आलेल्या विविध जालख्यांतील पदयात्री साईभक्तांनाही साई धर्मशाळेत निवासाची सुविधा दिली गेली

याशिवाय, पीआरओ सशुल्क दर्शन पासांद्वारे ५५ लाख ८८ हजारांची रक्कम जमा झाली. उत्सव काळात सुमारे ३ लाखांहून अधिक भक्तांनी समाधी मंदिरात साईदर्शनाचा लाभ घेतला.

देणगीचा उपयोग संस्थानचे प्रसादालय, रुग्णालये, शैक्षणिक संकुल तसेच साईभक्तांसाठी विविध सेवा सुविधा विकसित करण्यासाठी करण्यात येतो. असे गाडीलकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here