गरजू शेतकर्‍यांची कर्जमाफी करणार; महसूलमंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

0
87

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्याऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. ले-आऊटवाल्याना, फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्याऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. अमरावतीच्या कौडण्यापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहि‍णींसाठी जो महिना 1500 रुपये सुरू केला होता, तो पुढच्या काळात लाडक्या बहिणीना 2100 रुपये देणार आहोत. आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे शेतात वीजेचा बिल येणार नाही.

तसेच, आमच्या सरकारने सांगितले की, खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचे लेआऊट आहेत, फॉर्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. धन दांडग्याना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती समिती घोषित करू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात बोलताना म्हटलं होतं की आम्ही लवकरच त्यासाठी एका समितीची स्थापना करू, या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ, त्यामुळे आता ही समिती कधी स्थापन होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, या संदर्भात आता बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here