एसटी बस प्रवासात महिलेच्या बॅगेतील ८ लाख ४० हजारांचे दागिने चोरी

0
32

अहिल्यानगर : एसटी बसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नकळत फसवणूक करत हातचलाखीने चोरटे चोरी करून जातात, मात्र ही चोरी लक्षातही येत नाही. अशीच घटना नगर शहरात घडली. प्रवास करत असताना एका महिलेच्या बॅगमधून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना जुने बसस्थानक ते तारकपूर बसस्थानक या दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी घडली.

सुहासिनी पंडित आडोळे (वय ४८, रा. पोलीस कॉलनी, नंदनवन नगर, बोल्हेगाव) या आपल्या पतीसह सोलापूरहून नगरकडे एसटीने येत होत्या. त्या तारकपूर स्थानकावर उतरल्या आणि घरी गेल्यानंतर बॅग तपासल्यावर दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

या प्रकरणात फिर्यादींनी बसमध्ये शेजारी बसलेल्या आणि चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेल्या एका अनोळखी तरुणीवर संशय व्यक्त केला आहे. तोफखाना पोलिसांनी या फिर्यादीवरून अनोळखी संशयित तरुणीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८० (ब) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here