उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन, बाळासाहेबांची शिवसेना ५९ वर्षांची झाली

0
56

मुंबई : भूमिपुत्र मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. या संघटनेला 59 वर्ष पूर्ण होताहेत.

मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी अन्यायाविरुध्द जागरूक केले. त्यांच्या मनगटात लढण्यासाठी बळ दिले. शिवसेना या चार अक्षरांचे अभेद्य कवच मराठी माणूस आणि महाराष्ट्राभोवती उभे केले.

स्थापनेपासून शिवसेनेच्या प्रवासाला जवळपास सहा दशक पूर्ण होतील, दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत अनेक बंड झाली, छगन भुजबळ, नारायण राणे स्वतः राज ठाकरे यांनी तर स्वतःचा नवा पक्ष उभा केला. अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्ण संघटनाच गेली. दुसर्‍या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना उभी आहे.

आता महाराष्ट्रात एकाच वेळी दोन शिवसेना आणि दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे तर उद्धव ठाकरे यांचा माटुंगा येथे वर्धापन दिन संपन्न होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here