खुशखबर! तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, नितीन गडकरी यांची घोषणा

0
94

नवी दिल्ली : बिगरव्यावसायिक खाजगी वाहनांसाठी 3 हजार रुपयात फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. या पासच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावर संपूर्ण देशात प्रवास करता येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, ही योजना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याची किंमत 3 हजार असून, मुदत एक वर्ष किंवा 200 खेपा अशी आहे.

राजमार्ग यात्रा मोबाईल अॅप किंवा एनएचआयच्या अधिकृत वेबसाईट वर फास्टॅग वार्षिक पास खरेदी आणि सक्रिय करता येईल. यासाठी ऑनलाइन 3 हजार पेमेंट करावे लागेल, त्यानंतर पास सुरू होईल. पास सक्रिय करताना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर याबाबत एसएमएस येणार आहे.

एका नाक्यावर सरासरी ५० रुपये द्यावे लागत असतील आणि २०० वेळा टोल भरावा लागला तर त्याची किंमत १०,००० रुपये होते. आता यातील वर्षाकाठी सात हजार रुपयाची बचत होईल. असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here