अहिल्यानगर : शहरात लव्ह जिहाद सरखा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण भरकटत चालली आहे. इंस्टाग्राम वर झालेल्या ओळखीतून २१ वर्षीय तरुणीची फसवणूक केली गेली. तिच्याशी जवळीक वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवत भेटायला बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी जहीद तांबोळी याच्या विरुद्ध ४ ऑक्टोबर रोजी पहाटे बीएनएस कलम ६९, ३५१ (२), ३५२, १२७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
आरोपी जहीद तांबोळी याने केडगाव मधील एका पान टपरीमध्ये तरुणीला कोंडून ठेवत तिच्यावर अत्याचार केले. तिने लग्नाचा विषय काढल्यावर टाळाटाळ करत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिडीत तरुणी गेल्या ४ वर्षांपासून इंस्टाग्राम वापरत असून त्यावरच तिची आरोपी जहीद तांबोळी याच्याशी ओळख झाली होती.
दोघे इंस्टाग्रामच्या माध्यमातून तसेच मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. जहीद हा तिला आपण लग्न करू असे वारंवार म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्यास होकार कळविला व १६ सप्टेंबर रोजी पहाटे त्याला पहिल्यांदा भेटण्यासाठी ती बसने नगरमध्ये आली.
मात्र त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास दौंड रोडवरील एका लॉज मध्ये नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढला असता. नंतर पाहू, तू आता पुण्याला जा असे सांगून तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. तिला शिवीगाळ करत दमदाटी केली.








