संगमनेर नगरपालिकेवर महिलाराज, आरक्षणामुळे अनुभवी पुरुष नेत्यांचा हिरमोड

0
33

संगमनेर : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ८) प्रांताधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. एकूण ३० प्रभागांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू करण्यात आले आहे. यापूर्वी नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आलं होतं. तर आता नगरसेवक पदांपैकी ३० पैकी १५ पदांवर महिला नगरसेविका विराजमान होणार आहेत.

या निर्णयामुळे जोरदार तयारीत असलेल्या अनेक पुरुष इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांना आपल्या घरातील महिलांना उमेदवारी देण्याचा पर्याय उरला आहे. परिणामी पुढील पाच वर्षे संगमनेर नगरपालिकेचा कारभार १५ महिला नगरसेविका आणि महिला नगराध्यक्षा यांच्या हाती राहणार आहे.

प्रांताधिकारी अरुण उंडे व प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेक आजी-माजी नगरसेवक, राजकीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी उपनगराध्यक्ष इसाकखान पठाण व वसीम शेख यांचा प्रभाग ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. काँग्रेसचे आरिफ देशमुख यांच्याही प्रभागावर ओबीसी आरक्षण लागू झाल्याने त्यांनाही प्रभाग बदलण्याची वेळ आली आहे. प्रभाग क्रमांक २ आणि १३ अनुसूचित जातींसाठी राखीव झाले आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे:

प्रभाग १ (अ) मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग २ (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग ३ (अ) मागासवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग ४ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग ५ (अ) मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग ६ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग ७ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग ८ (अ) मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग ९ (अ) मागासवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग १० (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग ११ (अ) मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग १२ (अ) मागासवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग १३ (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग १४ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग १५ (अ) मागासवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला

हे आरक्षण लहान मुलांच्या हस्ते चिठ्या काढून पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत महिलांचा प्रभाव लक्षणीय वाढणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here