साईचरणी ४ कोटी २६ लाखांचे दान ; रामनवमी उत्सवानिमित्त हजारो भाविकांचे साईदर्शन

0
138

शिर्डी : श्रीरामनवमी उत्सवानिमित्त देश-विदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिले. शनिवार दि. ५ एप्रिल ते ७ एप्रिल या कालावधीत ४ कोटी २६ लाख ०७ हजार १८२ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यामध्ये रोख स्वरुपात रुपये १ कोटी ६७ लाख ८९ हजार ७८ दक्षिणा पेटीत देणगी प्राप्त झाली असून, देणगी काऊंटरवर ७९ लाख ३८ हजार ८३० रुपये, पी. आर. ओ. सशुल्क पास देणगी
४७ लाख १६ हजार ८००, ऑनलाईन चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट क्रेडीट कार्ड, युपीआय याद्वारे १ कोटी २४ लाख १५ हजार २१४, सोने ८३.३०० ग्रॅम रक्कम रुपये ०६ लाख १५ हजार ७८२ व चांदी २०३०.४०० ग्रॅम रक्कम रुपये ०१ लाख, ३१ हजार ४७८ यांचा समावेश आहे.

श्रीराम नवमी उत्सव कालावधीत अडीच लाखाहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभघेतला. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोधर अतिरिक्त निवास व्यवस्वेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभघेतला. तसेच साईधर्मशाला बंधे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सांगितले.

दिड लाख भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ
उत्सव कालावधीमध्ये साईप्रसादालयाद्वमे सुमारे १ लाख ६२ हजार ५२९ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत १ लाख ७६ हजार २०० साईभक्तांना मोफत बंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत ३ लाख ६३ हजार ८७४ साईप्रसाद पाकिटांची विक्री झाली असून त्या माध्यमातून ७२ लाख ६१ हजार ४८० रूपये प्राम झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here