भंडारदरा धरणाचा ऐतिहासिक निर्णय ; मार्चमध्ये पहिलेच आवर्तन सुरू

0
185

अकोले- भंडारदरा धरणातून १२०० क्युसेक बेगाने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून या वर्षांतील भंडारदऱ्याचे हे पहिलेच आवर्तन आहे. धरणाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात पहिले आवर्तन मार्च महिन्यात सोडले ताण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बीजनिर्मिती केंद्राबरोबरच २०० फुटांवरील व्हॉल्व्हमधून पाणी सोडल्याने भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणारा अम्ब्रेला फॉल सुरू झाला, मार्चच्या मध्यंतरास ११ हजार ३९ द. ल. घ. फू. क्षमतेच्या मंडारदरा धरणात तब्बल १० हजार ६३६ द. ल. घ. फू. पाणी शिल्लक आहे. या मुबलक पाणीसाठ्यामुळे आता थेट जूनपर्यंत प्रत्येक आवर्तनात अम्ब्रेला फॉलचे दर्शन घडू शकेल, धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भंडारदरा, तसेच कोंदणी या दोन्ही जलविद्युत केंद्रांमधून बीजनिर्मिती सुरू झाली आहे.

भंडारदरा लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामात २ आवर्तन सोडण्यात आली. मात्र ही दोन्ही आवर्तने निळवंडे धरणातून सोडली गेली. त्यामुळे भंडारदऱ्याचा पाणीसाठा मार्च उजाडला तरी फारसा कमी झाला नाही, रविवारी संध्याकाळी ६ वाजता धरणातून १२०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यातील ८२० क्युसेक पाणी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या बीजनिर्मिती केंद्रातून तर ३८० क्युसेक पाणी धरणाच्या सर्वात उंचावरील मोरीतून सोडण्यात आले. दीन फूट उंचीवरील या मोरीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे भंडारदऱ्याचा प्रसिद्ध अम्ब्रेला कॉल अवतीर्ण झाला,
उन्हाळ्याच्या दिवसांत धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होत जातो तसतसा हा फॉल क्षीण होत जातो. शेवटच्या दोन आवर्तनांत तो खुत होतो.

त्यामुळे एप्रिल, मेमध्ये त्याचे दर्शन तसे दुर्मिळ असते, मात्र, घरणात असलेल्या मुबलक पाण्यामुळे यावर्षी शेवटच्या आवर्तनातही फॉलचे दर्शन पर्यटकांना होणार आहे. सध्या धरणात सुमारे ९६ टक्के पाणीसाठा असल्याने धरणाच्या मोरीतून पाणी दाबाने बाहेर फेकले जात आहे. त्यामुळे अम्ब्रेला फॉलही जोरकसपणे फेसाळत कोसळू लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here