श्रीगोंदा तालुक्यात चार बांगलादेशी महिलांना केली अटक

0
116

श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर): नाशिकचे दहशतवादविरोधी पथक व श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पथकाने शुक्रवारी (दि. ७) संयुक्त कारवाई करत बनपिंप्री (ता. श्रीगोंदा) येथून चार बांगलादेशी महिलांना अटक केली. बेकायदा राहणाऱ्या या महिलांकडून १ लाख २६ हजार किंमतीचे मोबाइल जप्त केले आहेत.

मुरसानिला अख्तार सफीनुर सिकंदर ऊर्फ जुई जिमारेल मंडल, रोमाना अख्तार रुमी ऊर्फ गीता आकाश शिंदे, सानिया रबीउल इस्लाम खान ऊर्फ मीरा मंडल, सनिफा जावेद अलिखान ऊर्फ सनिफा जहीद मंडल या चार महिलांना एका हॉटेलमधून अटक केली आहे.

बनप्रिंपी शिवारात बांगलादेशमधील चार महिला विनापरवाना राहत असल्याबाबतची माहिती नाशिक येथील दहशतवादीविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळाली होती. त्यावर शुक्रवारी श्रीगोंदा पोलिसांची मदत घेऊन त्यांनी बनपिंप्री येथे जाऊन चार बांगलादेशी महिलांना पकडले. पोलिस कॉन्स्टेबल योगेश भापकर यांनी याबाबत फिर्याद दिली. या पथकात पोलिस कॉन्स्टेबल गणेश अहिरे, भगवान गांगर्डे, प्रमिला उबाळे तसेच होमगार्ड विशाल गोरखे, दीपाली मोटे, सहायक फौजदार सुखदेव मुरकुटे, राकेश खेडकर यांचा समावेश होता.

रोमानाची झाली गीता

बांगलादेशी तरुणी रोमाना रूमी व भारतीय तरुण अशोक शिंदे यांच्यात प्रेमसंबंध होते. नंतर दोघांनी लग्न केले.

त्यानंतर तिचे नाव गीता झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here