नागपूर येथील दंगलीवर आमदार अमोल खताळ पाटील यांची तीव्र प्रतिक्रिया – “देशद्रोह्यांना सोडता कामा नये!”

0
147

नागपूर – काल नागपूरमध्ये घडलेल्या हिंसक घटनेनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांवर दगडफेक आणि हल्ला करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ट्विट करत म्हटले आहे, “काल नागपुरात घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलिसांवर दगडफेक आणि हल्ला करणाऱ्या देशद्रोह्यांना सोडता कामा नये! औरंग्याच्या चवताळलेल्या या अवलादींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय आणि सामाजिक स्तरांवर चर्चेला उधाण आले आहे. नागपूरमध्ये झालेल्या या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच, राज्य सरकारही या घटनेचा बारकाईने आढावा घेत आहे.

दरम्यान, नागपूर पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, हिंसाचारात सामील असलेल्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. राज्यातील जनतेने शांतता राखावी आणि कायदा हातात न घेता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या घटनेनंतर नागपूरमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता असून, पुढील परिस्थितीवर सरकार आणि प्रशासनाचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here