आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाची संधी

0
91

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील; जनसेवा फौंडेशनच्या शेंडी महाविद्यालयातील उपक्रम

अकोले : जनसेवा फौंडेशन संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अभासी तंत्रज्ञानाद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि कौशल्य शिक्षणाच्या संधी निर्माण करून देण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडवणे हे कठीण, असे आव्हान आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाबाबत शिक्षकांची भूमिका आणि परंपरागत शिक्षणाला आधुनिक बदलाची दिलेली जोड असायला हवी, या उद्देशाने नियमित अभ्यास क्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य किंवा इतर ज्ञान आत्मसात करावे या उद्देशाने आभासी तंत्रज्ञाद्वारे शिक्षणाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मंत्री विखे पा. यांनी व्यक्त केला.

आभासी प्रशिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होईल. नव्या तंत्रज्ञानातून विशेष विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व व्यक्तिमत्व विकासात भर पडेल. रोजगार व स्वयंरोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, विविध विषयांचे ज्ञान व मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींकडून सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सहज मिळण्याची सुविधा या उपक्रमात आहे.

हे महाविद्यालय लवकरच राष्ट्रीय पातळीवर आदिवासी उद्योजकता आणि उपजीविकाः समस्या आणि आव्हाने, या विषयावर आभासी तंत्रज्ञान यावर परिषद आयोजित केली असल्याचे डॉ. हरीभाऊ आहेर म्हणाले.

याउपक्रम पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सचिव भारत घोगरे, डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. हरिभाऊ आहेर यांचे मार्गदर्शन मिळत आहे, असे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी सांगितले.

आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये अर्थिक समस्यांबरोबरच जाण्या-येण्याची गैरसोय, उपलब्ध होत नसलेली माहिती या अडचणी संस्थेने विचारात घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे स्पष्ट करून, उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना
घरी बसून विविध विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल.

-राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here