नेवासा : तालुक्यातील सन १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरविण्याकरता २६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटीची मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी केली होती. नेवासा मतदार संघातील पुनर्वसित गावाचे परत मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करावा, या मागणीचा पाठपुरावा केला होता. सुरवातीला हा आराखडा तयार केला. त्यावेळी ५० वर्षापूर्वीच्या पुनर्वसित गावांना वगळण्यात यावे, असा निर्णय होणार होता. याबाबत आ. लंघे यांनी वित्त मंत्री अजित पवार यांची भेट घेऊन १९७६ पूर्वीच्या गावांना यातून वगळू नये अशी मागणी केली. याची दाखल घेत. हा आराखडा दुरुस्त करून १९७६ पूर्वीच्या गावांचा यात समावेश करण्यात आला. याम ळे २६ गावात अपूर्ण असलेल्या सर्व नागरी सुविधाची कामे पूर्ण होणार आहेत. अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पथदिवे यांचा यात समावेश असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
आमदार लंघे यांच्या पाठपुराव्यामुळे १९७६ पूर्वीच्या गावाचा कृती आराखड्यात समावेश बहिरवाडी, फत्तेपूर, प्रवरासंगम, खलालपिंपी, बकूपिंपळगाव, मंगळापुर, खेडले काजळी, तरवडी, उस्थळ खालसा, भालगाव, धामोरी, गळनिंब, गोपाळपूर, राम डोह, सुरेगाव गंगा, जैनपुर, रामडोह, सुरेगाव दही, खामगाव, वरखेड, उस्थळ खालसा, बेलपांढरी, बोरगाव, गोधेगाव अशी गावे आहेत.








