महावीर जयंती जन्म कल्याणकचा आज सोहळा

0
63

श्रीरामपूर : येथील दिगंबर जैन समाज व स्थानकवासी जैन संघ, संभवनाथ मूर्तीपूजकसंघ या सकल जैन संघाच्यावतीने आज दि. १० एप्रिल रोजी श्री महावीर जयंती जन्मकल्याणक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जैनस्थानकमध्ये जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्रमण संघाच्या जैन साध्-वीजी पूज्या रमणीकमुनी म. सा., सुशिष्य तपस्वी सतेंद्रजी म. सा., सेवाभावी पू. वैभवमुनी म. सा. या तीन साध्वींचे आगमन झाले आहे.

आज सकाळी ७.३० वा. मेनरोडवरील दिगंबर जैन मंदिरापासून भगवान महावीरांच्या सजविलेल्या पालखीची व प्रतिमेची शोभायात्रा निघणार आहे. दिगंबर जैन मंदिर व संभवनाथ मूर्तीपूजक जैन मंदिरामध्ये भगवंताच्या प्रतिम `वर अभिषेक व पूजा विधी होणार आहे. जैनस्थानकमध्ये साध्वींच्या उपस्थितीत नवकार महामंत्र जाप, आनंद जैन पाठशाळा व आनंदामृत कन्या मंडळाचे भक्तीपर गायन होणार आहे. महासतीजींचे प्रवचन व मंगलपाठाने समारोप होईल.

सर्व कार्यक्रमात सकल जैन समाजाने सहभागी व्ह-ावे, असे आवाहन दिगंबर जैन समाज अध्यक्ष संजय कासलीवाल, संभवनाथ मूर्तीपूजक संघ विश्वस्त शैलेश बाबरीया व स्थानकवासी जैन संघाचे विश्वस्त रमेश लोढा व स्थानकवासी जैन संघ, भारतीय जैन संघटना, वीर सेवा दल, आदर्श जैन महिला व बहुमंडळ, नवकार प्रतिष्ठाण, आनंद प्रार्थना ग्रुप, चंदना मंहिला मंडळ, शांतीसागर पाठशाळा, महावीर युवा मंच, जैन ड्युडस्क, आनंदामृत कन्या मंडळ व जैनस्थानक चौक मित्रमंडळ आदींनी केले आहे.

गौतमी प्रसादाचे आयोजन
दिगंबर जैन समाजासाठी माळी बोर्डिंग मंगल कार्यालयात गौरव बिपीन चुडीवाल परिवाराच्यावतीने गौतम प्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. जैन स्थानकवासी समाजासाठी जैन स्थानक छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे स्व. श्री माणिकचंदजी खुशालचंदजी कर्नावट यांच्या स्मरणार्थ प्रेमचंद, चंद्रकांत, सुर्यकांत, अभिजीत, पियुष, आशिष कर्नावट परिवाराच्यावतीने गौतम प्रसादचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here