गावठी कट्टयासह एकास पकडले

0
111

श्रीरामपूर : गेल्या दोन दिवसांपासून श्रीरामपूरचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम नवमी यात्रा उत्सव सुरु असून पो.नि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तावर असलेल्या शहर पोलीसांनी थत्ते मैदानावर यात्रेत गावठी कट्टा पिस्तुल व ४ जीवंत काडतुसासह एकाला पकडले. पोलीसांच्या सतर्कतेमुळे काही घडवण्याच्या अत च पोलीसांनी आरोपीला पकडले.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीसात पो. शि. अमोल गायक वाड याच्या फिर्यादीवरून पकडलेला आरोपी मनोज संजय साबळे (वय २३ रा. साई मंदिर जवळ, डावखररोड, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउनि समाधान सोळंके, पोउनि दादाभाई मगरे, पोलीस कर्मचारी अमोल पाडोळे, पंकज सानप, सागर बनसोडे, संजय बडे हे मंगळवारी रात्री थत्ते मैदान येथे सुरु असलेल्या यात्रेत पेट्रोलिंग करत असतांना मौत का कुवा जवळ जॉगिंग ट्रॅकवर एक तरूण गावठी कट्टयासह असल्याची माहीती मिळाली त्याला पंचासह पकडले असता त्याच्या जवळ ०४ जीवंत काडतुस व गावठी कट्टा पिस्तुल मिळून आले.

एसपी राकेश ओला, अप्पर पो-लीस अधिक्षक कलुबर्मे, डीवायएसपी शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. नितिन देशमुख यांच्या नेतत्वाखाली ही कामगीरी शहर पोलीसांनी केली. थत्ते मैदानावर यात्रेत पिस्तुल सह आरोपी पकडल्याची वार्ता शहरभर पसरली असता त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाकडे पोलीस कसून चौकशी करीत असून आणखी कट्टे सापडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here