उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यूकांड; नर्तकीचे व्हिडिओ व्हायरल, घातपात की आत्महत्या यावरून चर्चेला उधाण

0
32

सोलापुर :  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कला केंद्रात नाचणारी पूजा गायकवाड या नर्तिकेसोबत विवाहबाह्य संबंधातून बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत कला केंद्रातील 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाडला अटक केली आहे.

कला केंद्रात नाचणारी पूजा गायकवाड या नर्तिकेने गोविंद बर्गे यांना लुबाडलं आहे. त्यांच्याकडून पैसे, महागडा मोबाइल घेतला आहे. तसेच जमीन आणि सोनं खरेदी केल्याचा आरोप उपसरपंच बर्गेंच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. गेवराईतील घर नावावर करण्यासाठी पुजा गायकवाड उपसरपंच गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करीत होती. म्हणून गोविंद यांना तिच्या गावी बोलावून घातपात केला. ही आत्महत्या नाही, हा घातपात आहे असा आरोप गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणानंतर सोशल मीडियावर पुजा गायकवाड हिचे व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. संबंधित प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली, तसेच घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर काही वस्तू जप्त केल्या होत्या. तेव्हा पोलिसांना एक बंदूक सापडली होती. त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोविंद बर्गे याने स्वतःवर गोळी झाडून घेतली की अन्य काही घडले या दृष्टीने देखील पोलीस सध्या तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here