शिडी : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार (३० मार्च) पासून नाईट लैंडिंग सुविधा सुरु झाली आहे. ६० प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान रात्री ९.३० बाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचं साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक
कापून स्वागत केलं.
२०१८ साली कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर आजतागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला आहे. शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता नाईट लेंडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती ती आता पूर्ण झाली आहे. तर नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभ मेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे.
इंडिगो कंपनीच ६० प्रवाशांना घेवून पहिल विमान शिर्डी विमानतळावर उतरले. यावेळी साईभक्तांमध्ये उत्साह बघायला मिळाला. ही सुविधा सुरू होताच शिडी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प, साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले. साधारण एक वर्षापूर्वी ८ एप्रिल २०२४ रोजी शिडीं विमानतळावर नाईट लैंडिंगची यशस्वी चाचणी पार पडली. त्यानंतर भाविकांची बाढ़ती मागणी लक्षात घेता महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण कंपनीने नाईट लैंडिग सुविधा सुरु केली आहे








