संगमनेर : संगमनेर येथील व्हॉईस ऑफ मीडिया व एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.२६ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी शिबिरातील सहभागी पत्रकारांची तपासणी केली.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी याठिकाणी असलेल्या एसएमबीटी क्लिनिक अमृतवाहीनी रुरल अँड हॉस्पिटल मध्ये व्हॉईस ऑफ मीडिया व एसएमबीटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जवळपास २५ पत्रकार बंधूची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ब्लड प्रेशर ब्लड टेस्टिंग, लिपिड प्रोफाइल, ईसिजी, २ डी इको, टीएमटी आदी प्रकारच्या खर्चिक तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत. त्यानंतर डॉ. गौरव वर्मा यांना सर्वे रिपोर्ट्स दाखवण्यात आले. यावेळी डॉ. गौरव वर्मा व श्री. श्रीराम कुन्हे सर यांचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले. तपासणी झाल्यानंतर कोणाला त्रास असल्यास त्याच्यावर घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता अभंग यांनी दिली. यावेळी हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या शिबिरामध्ये जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख, सचिव अमोल मतकर, खजिनदार गोरक्ष नेहे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष भारत रेघाटे, सचिव सचिन जंत्रे, संजय अहिरे, शेखर पानसरे, सुभाष भालेराव, आनंद गायकवाड, नीलिमा घाडगे, चंद्रकांत शिंदे, नवनाथ गाडेकर, नवनाथ वावरे, दत्तात्रय घोलप, सुखदेव गाडेकर, सुनील महाले, चंद्रकांत महाले, सचिन मदने आदींनी सहभाग घेतला होता.








