सुनीता विल्यम सुखरूप पोहचल्या

0
103

फ्लोरिडा: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने आणि १४ दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन फ्रीडम अंतराळयान १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.

हे दोन्ही अंतराळवीर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त क्रू फ्लाइट टेस्ट मिशनवर गेले होते, परंतु स्टारलाइनर अंतराळयानाच्या भ्रस्टर्समध्ये समस्या आल्यामुळे त्यांचा ८ दिवसांचा प्रवास ९ महिन्यांत बदलला.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त क्रू फ्लाइट टेस्ट मिशनवर गेले. या मोहिम `चा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाची अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता.

अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरील त्यांच्या ८ दिवसांच्या कालावधीत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. मोहिमेदरम्यान त्यांना अंतराळयान हातानेही उडवावे लागले.

बोईंगच स्टारलाइनर अंतराळयान ५ जून २०२४ रोजी रात्री ८:२२ वाजता अॅटलस व्ही रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. ते ६ जून रोजी रात्री ११:०३ वाजता अंतराळ स्थानकात पोहोचले. ते रात्री ९:४५ वाजता पोहोचणार होते, पण रिअॅक्शन कंट्रोल भ्रस्टरमध्ये समस्या होती. स्टारलाइनर अंतराळयानाच्या २८ रिअॅक्शन कंट्रोल भ्रस्टरपैकी पाच निकामी झाले होते. २५ दिवसांत ५ वेळा हेलियम गळती झाली. थ्रस्टर्सना प्रणोदक पोहोचवण्यासाठी हेलियम अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, अंतराळयानाच्या सुरक्षित परतीबद्दल चिंता होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here