उष्मघाताने घेतला युवतीचा बळी

0
77

श्रीगोंदे : शहरात काल एक हृदयद्रावक घटना घडली. संत शेख महंमद महाराज यात्रेत फुलं, तोरण आणि खेळणी विकणारी खुशी अनिल भोसले (वय १७, रा. सिलगुंडी, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) हिचा उन्हाच्या तीव्रतेमुळे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे यात्रेत व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.

श्रीगोंदे येथील श्री संत शेख मोहम्मद महाराजांची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेत खुशी नावाची मुलगी तोरण, खेळणी, फुगे विकत होती. यात्रा संपल्यानंतर मोठमोठे पाळणे खोलून दुसरे कडे जाण्याची तयारी करत असताना दुपारी बारा वाजेच्या सुमारास उन्हाच्या तीव्रतेमुळे खुशी चक्कर येऊन पडली. काही क्षणातच तिची प्राणज्योत मावळली

आई-वडिलांच्या आधाराशिवाय लहानाची मोठी झाली. तिची आई दोन वर्षांपूर्वीच वारली होती, तर वडील व्यसनाधीन असल्याने तिला आधार नव्हता. त्यामुळे ती मामासोबत गावोगावी यात्रा फिरत उदरनिर्वाह करत होती. संत शेख महंमद बाबा यात्रेच्या निमित्ताने ती श्रीगोंद्यात आली होती. यात्रेच्या माध्यमातून फुलं आणि तोरण विकून ती आपले आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन मिळवत होती.

श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात खुशीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येईल. या घटनेमुळे ऊन्हाच्या तीव्रतेचा प्रभाव आणि यात्रेतील व्यावसायिकांची परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here