Accident News : नगर-मनमाड महामार्गावर विचित्र अपघात, तीन वाहने एकमेकांवर धडकली

0
160

Accident News : नगर-मनमाड महामार्गावर तीन वाहनांचा अपघात झालाय. एस टी बस, मालवाहतूक वाहन आणि चारचाकी वाहन एकमेकांना धडकले.

नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव हद्दीत तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय.

एसटी महामंडळ बस, मालवाहतूक वाहन आणि चार चाकी अल्टो या तीन वाहनांचा अपघात झालाय.

शिर्डीकडे जाणारा कंटेनर अचानक थांबल्याने कोपरगाव हून पुण्याकडे जाणारी एस टी बस कंटेनरला धडकली.

यानंतर बसच्या मागील वाहन एकमेकाला धडकले.

या अपघातात एसटी चालक, वाहक ह्या दोघांसह दोन ते तीन प्रवासी किरकोळ झाले आहेत.

नगर- मनमाड महामार्गावर सावळीविहीर ते कोपरगाव महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here