रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी भरधाव इनोव्हाने लेन बदलली; दुचाकीला समोरून धडक, तिघे गंभीर जखमी

0
36

अकोले : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर खड्डे चुकवण्यासाठी भरधाव येत असलेल्या इनोव्हा चारचाकीने अचानक लेन बदलली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला वेगात धडक दिली. गुरुवारी सायंकाळी सहा-साडेसहा वाजण्याच्या सुमारास अकोले-राजूर रस्त्यावरील पथिक पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये रामचंद्र मेंगाळ, वृषाली कडाळी आणि रोहिणी मेंगाळ यांचा समावेश आहे. यापैकी रामचंद्र मेंगाळ हे गंभीर जखमी झाले असून, वृषाली कडाळी या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर रोहिणी मेंगाळ यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तिघांवरही अकोले येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातात धडकलेली इनोव्हा अंबड येथील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची असल्याचे समजते. मात्र, अपघातानंतर उशिरापर्यंत अकोले पोलिस ठाण्यात कोणत्याही स्वरूपाची गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

या घटनेमुळे राज्यमार्गावरील खड्डे आणि वाहनचालकांच्या बेफिकीरपणामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली आहे. ग्रामस्थांनी तातडीने खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here