उपजिल्हाधिकारी सोळंके, संजीवनीमध्ये राज्यस्तरीय टेबल टेनिस व बॅडमिटन मुलींच्या स्पर्धा
कोपरगाव : खेळात आपण सहभागी झालोच पाहीजे. कारण खेळातुन मिळणारी खिलाडूवृत्ती यशाबरोबरच अपयश पचविण्याची क्षमता निर्माण करते. खेळामुळे बौधिक क्षमता वाढीबरोबरच, एकग्रता व सांघिक काम करण्याची सवय लागते, ती जीवनात अत्यंत म हत्वाची असते, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सायली सोळंके यांनी केले.
इंटर इंजिनिअरींग डीप्लामा स्टूडन्टस् स्पोर्टस् असोसिएशन,महाराष्ट्र राज्य प्रायोजीत व संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक आयोजीत राज्य स्तरीय आंतरविभागीय मुलींच्या बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी सोळंके प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या.याप्रसंगी राज्यभरातुन आलेले संघ प्रमुख, दोनही स्पर्धांचे विविध पॉलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधुन आलेल्या बॅडमिटनचे १२ संघ व टेबल टेनिसचे ९ संघ मिळुन एकुण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे क्रीडा शैक्षक प्रा. शिवराज पाळणे, डॉ. गणेश नरोडे, सत्यम कोथळकर व प्रा. अक्षय येवेले यांनी विशेष परीश्रम घेतले. प्रा. आय. के. सय्यद यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.








