संगमनेर शहरात महास्वच्छता अभियान – आमदार अमोल खताळ सहभागी

0
125

संगमनेर, (दि. २ मार्च) : महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले.

या अभियानात स्थानिक आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती होती. त्यांनी स्वतःसुद्धा स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेत शहरातील विविध ठिकाणी कचरा उचलून स्वच्छतेचा संदेश दिला.

बस स्थानक परिसर, एम.एस.ई.बी. कार्यालय, आणि इतर प्रमुख ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रत्येकाने या उपक्रमात भाग घेऊन शहराची स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.

प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कचरा संकलन, रस्त्यांवरील कचरा उचलणे आणि सार्वजनिक स्वच्छता सुधारणेसाठी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच स्थानिक नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

आमदार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून हे अभियान यशस्वीपणे पार पडले. हे अभियान संगमनेर शहरात स्वच्छतेची जाणीव आणि त्याची महत्त्वाची भूमिका नागरिकांमध्ये रुजवण्याचा उद्देश साधत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here