आ. विठ्ठलराव लंघे; नेवासा वकील संघाकडून आ. लंघेचा सत्कार
नेवासा : जिल्हा न्यायालयाच्या नुतन इमारतीसाठी ५१ कोटी २३ लाख रुपये खर्चास आ. विठ्ठलराव लंघे यांनी नुकतीच प्रशासकिय मान्यता मिळवून दिल्यामुळे नेवासा वकील संघाच्यावतीने आमदार विठ्ठलराव लंघे यांचा काल, (दि.१) रोजी नेवासा न्यायालयाच्या वकील कार्यालयात सत्कार करण्यात आला तर आ. लंघे यांनी वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी आ. लंघे, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गणेश निकम, ॲड. अजय रिंधे, उपाध्यक्ष सुदाम ठुबे, माजी अध्यक्ष ॲड. कल्याण पिसाळ, ॲड. अशोकराव करकड, जेष्ठ विधिज्ञ ॲड. देसाई, अबा देशमुख, ॲड. बी. एस. काळे आदी उपस्थित होते.
नेवासा वकील संघाचे पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण नवी इमारत कामास प्रशासकीय मान्यता मिळवून दिलेली असून भविष्यातही आपण वकील संघाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
नेवासा न्यायालयाच्या या जुन्या इमारतीमध्ये ज्ञानदान करण्यासाठी न्यायमुर्ती, वकील व पक्षकारांसाठी असलेली ही इमारत अत्यंत कमी पडत होती. या इमारतीमध्ये सध्या जिल्हा न्यायाधीश, दोन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तसेच चार कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधिश असे या इमारतीमध्ये कामकाज करीत असतांना ही इमारत आता न्यायालयीन कामासाठी अपुरी पडत होती. त्यामुळे येथे काम करण्यासाठी पक्षकार व वकिलांची तसेच न्यायालयाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे आपण वकील संघाने केलेल्या पाठपुराव्यामुळे या नविन इमारतीसाठी ५१ कोटी २३ लाख रुपये खर्चास प्रशासकिय मान्यता मिळवून दिलेली आहे.
-विठ्ठलराव लंघे, आमदार








