आमदार संग्राम जगतापांना धमकी देणाऱ्याला तेलंगाणातून अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
54

अहिल्यानगर : नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसापासुन प्रखर हिदुत्ववादी भुमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र काल (दि.४) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आमदार जगताप यांनी गेल्या काही दिवसापासुन प्रखर हिदुत्ववादी भुमिका घेतली होती. त्यामुळे नगर शहरातील वातावरण अक्षरशः ढवळुन निघाले होते. अक्कलकोट येथील हिंदुत्ववादी सभा त्यांनी चांगलीच गाजवली होती. अशातच पाथर्डी येथील जवळके येथील घटना तसेच नगर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी आमदार जगताप यांना ठार मारण्याची धमकी दिली होती.

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याच्या काल (दि.४) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला तेलंगणा येथून ताब्यात घेतले असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे.

आमदार जगताप यांचे खासगी स्वीय साहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करून आमदार संग्राम जगताप यांना दो दिन मे खत्म करूंगा अशी धमकी बुधवारी दिली होती. याबाबत सुहास शिरसाठ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार अनिस शेख हा तेलंगणा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here