शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार, अनिल मोहिते यांची माहिती

0
61

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये शहरातच स्थापन केली जाणार आहेत. याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असून, या दोन्ही महाविद्यालयांची स्थापना अहिल्यानगरमध्येच होईल, अशी माहिती भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी दिली आहे.

स्थानिक तरुणांना वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षणासाठी आता शहर सोडण्याची गरज भासणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयामुळे केवळ शिक्षणच नव्हे, तर आरोग्यसेवांचेही सशक्तीकरण होणार आहे. यासाठी लागणारी प्रशासकीय प्रक्रिया, तसेच जागेच्या निवडीबाबत शासन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.

अभियांत्रिकी महाविद्यालयासाठीही सर्व आवश्यक पावले उचलली जात असून, या माध्यमातून अहिल्यानगर हे वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येणार आहे. तसेच, या प्रकल्पांमुळे स्थानिक युवकांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी अनिल मोहिते यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी अनिल मोहिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या अकरा वर्षांमध्ये देशभरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि अहिल्यानगरच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here