मुंबईत दोन वाघांच्या डरकाळ्या, वर्धापनदिनी ठाकरे आणि शिंदेंचे शक्तीप्रदर्शन

0
49

मुंबई : आज (१९ जून) शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटांनी आपापल्या पद्धतीने वर्चस्व दाखवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

षण्मुखानंद सभागृह येथे ठाकरे गटाचा जल्लोष

शिवसेना (ठाकरे गट) आजचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात साजरा करत असून, सभागृह परिसरात ‘मुंबईत ठाकरेच’ अशा आशयाचे भव्य बॅनर झळकत आहेत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी व शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.

मर्यादित जागेच्या पार्श्वभूमीवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार आसनव्यवस्था करण्यात आली आहे, तर खासदार, आमदारांसाठी विशेष पासची तरतूद करण्यात आली आहे.

वरळीत शिंदे गटाची तयारी

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गटाचा मेळावा वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडणार आहे. ‘हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी’ असा संदेश देणारा शिंदेंचा वाघासोबतचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मेळाव्याचीही उत्सुकता ताणली गेली आहे.

महापालिका निवडणुकीचा नारळ फुटणार?

या वर्धापन दिन मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणार असल्याचं संकेत मिळत आहेत

मनसेशी युतीबाबत काय बोलणार उद्धव ठाकरे?
माजी नगरसेवकांच्या बैठकीत मनसेशी युतीबाबत चर्चा झाली असून, आज उद्धव ठाकरे यावर भाष्य करतील का? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here