मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा चॅम्पियन

0
123

वुमेन्स प्रिमिअर लीग : दिल्लीची फायनलमध्ये पराभवाची हॅटट्रीक

मुंबई- वुमेन्स प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव केलाय. मुंबईने दुसऱ्यांदा WPL ट्रॉफीवर नाव कोरलंय, तर दिल्ली कॅपिटल्सला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागलाय. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. मुंबईच्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ ८ धावांनी दूर राहिला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. दिल्लीने हाती आलेला सामना गमावला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नाणेफेक हरल्यानंतर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. खराब सुरुवातीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट स्कायव्हर ब्रेट यांनी ८९ धावांची भागीदारी करून मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. एकीकडे हरमनप्रीतने ६६ धावांची खेळी केली, तर दुसरीकडे स्कायव्हर ब्रेटने ३० धावा ठोकत तीन विकेट घेतल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाच ICTU पाठलाग करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला तेव्हा मारिजने कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याशिवाय कोणीही मोठी खेळी करू शकले नाही.

मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबईचा संघ महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये विजयी झाला होता. त्या सामन्यात एमआयने दिल्लीचा ७ गडी राखून पराभव केला होता, तर यावेळी दिल्लीला ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई हा एकमेव संघ आहे जो दोनदा थझङ चॅम्पियन बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here