दु:खद वार्ता – ब्राम्हणवाड्याचे वीर सुपुत्र संदीप गायकर शहीद!

0
189

ब्राम्हणवाडा, प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे शूर व कर्तव्यनिष्ठ जवान संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याच्या 15 मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना वीरमरण पत्करले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे केवळ ब्राम्हणवाडा गावच नव्हे तर संपूर्ण अकोले तालुका आणि जिल्हा शोकमग्न झाला आहे.

संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, राष्ट्रनिष्ठ आणि सेवाभावी जवान होते. देशासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देत अमरत्व प्राप्त केले. त्यांचे हे बलिदान अकोले तालुक्यासह संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

या दुःखद प्रसंगी ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, संपूर्ण ग्रामस्थ व अकोले तालुक्याच्या वतीने वीर जवान संदीप गायकर यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

जय हिंद! वीर जवान अमर रहें!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here