४० वर्ष झोपलेल्या नेत्याला अचानक जाग कशी आली !

0
115

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टिकास्त्र

आश्वी: संगमनेर तालुक्यातील बिरोध असणाऱ्या गावाना वगळून आश्वी बुद्रुक अप्पर येथील प्रस्तावीत तहसील कार्यालय होणार आहे. ४० वर्ष झोपलेल्या नेत्याला अचानक कशी जाग आली आणि तालुक्याच्या अस्मितेविषयी साक्षात्कार होऊ लागला. आत्ता बरे यांना तालुक्याच्या विभाजनाचे साक्षात्कार होण्यास सुरुवात झाली. आश्वीतील पिलावळे यांना विचारले पाहिजेल की, तुम्हाला आश्वी बुद्रुक येथील प्रस्तावित अप्पर तहसिल कार्यालय आपणास नको का? असे म्हणत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टिका केली.

याप्रसंगी प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील, विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, विश्वस्त ध्रुव विखे पाटील, मांची संस्थानचे शाळीग्राम होडगर, प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धिरज मांजरे, अँड. रोहिणी निधुते, अण्णासाहेब जन्हाड, मच्छिंद्र गायकवाड, वैशाली जन्हाड, मच्छिद्र ताजणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, आश्वी अप्पर तहसील कार्यालयास विरोध होणाऱ्या गावाच्या हरकती मागविण्यात येणार आहे. अशा गावांना वगळून आश्वी अप्पर तहसील कार्यालय होणार नाही. काहींनी तर संगमनेर तालुक्यातील स्वांतत्र्याचा लढा म्हणून आढावा केल्याचे समजते. यांचा अर्थ ४० वर्ष संगम नेर तालुक्यातील जनता ही पारतंत्र्यात रहात होती, असे म्हणावे लागेल.

माझा माझ्या मित्राला सल्ला आहे की, तुम्ही आता वास्तव्याला सामोरे जा. तुम्हाला संगमनेरची जनता वैतागली होती. त्यामुळे सुज्ज्ञ मतदारांनी निर्णय घेत आ. खताळ यांनी संगमनेर तालुका सुजलाम् करण्याची जबाबदारी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो की, तुम्ही आता काळजी करू नका जलसंपदा विभागाचा मी आता मंत्री आहे. उन्हाळ्याचा चटका सुरू झाला आहे. तुम्हाला पुन्हा पाण्याचे एक आर्वतन लवकरच मिळणार आहे, सर्वांनी तळे भरून घ्या.

यावेळी माधवराव गायकवाड, विनायकराव बालोटे, अजय ब्राम्हणे, सरुनाथ उंबरकर, विजयराव चतुरे, संजय गांधी, ज्ञानेश्वर वाकचौरे, कारभारी म्हसे, सरपंच अशोकराव खेमनर, हरीभाऊ ताजणे, विलासराव आंधळे, विजयराव म्हसे, डॉ. बाळासाहेब आंधळे, सुभाष चतुरे, गोरख म्हसे, जानकिराम गायकवाड, अनिल कंगणकर, अभिजीत म्हसे, मंजित गायकवाड, बाबा गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री विखेंचे टिकास्त्र
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता चिमटे काढले.

संगमनेरच्या लोकांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या मित्रांनी आ. खताळ यांना मुक्त हातानी कामे करून द्यावी. यापुर्वी मुठभर स्टोन क्रशर व वाळुवाल्याचे खिसे भरले जायचे. त्यांचे वैभव वाढत चालले होते. आत्ता संगमनेरचा आमदार हा सामान्य शेतकरी कुंटूबातील असुन तो सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे.

– राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here