मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया: “स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही”

0
100

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. त्यांनी विशेषत: राज्यातील वीज दर, शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांबद्दल बोलताना, तसेच राज्य सरकारच्या विविध निर्णयांबद्दल आपल्या भूमिका स्पष्ट केल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुतीमधील पक्षांवर मोठा विश्वास दाखवला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. या सरकारचा प्रत्येक निर्णय छत्रपतींच्या आदर्शांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मार्गदर्शनाला समर्पित आहे,” असे ते म्हणाले.

त्याच वेळी, गडकिल्ल्यांची ध्वस्तीकरण टाळण्यासाठी सरकारने १२ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. “आशिथ शेलार पॅरिसला जाऊन या किल्ल्यांचा प्रस्ताव ठेवले आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी वीज खरेदीच्या दराबद्दलही भाष्य केले आणि सांगितले की, वीज खरेदीचा दर कमी करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. “स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना वीज दरात १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. निर्णय घेतल्यानंतर काही मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यानंतरच स्थगिती दिली,” असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “जेव्हा खालच्या स्तरावर गडबडी होतात, तेव्हा चर्चा करून निर्णय घेतले जातात. या सरकारमध्ये सर्व निर्णय तिघांच्या सहमतीने घेतले जातात.”

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टीका केली आणि म्हटले की, “अजित पवार थेट अटॅक करतात, त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नाही.” ते म्हणाले की, “मंत्रिमंडळात होणाऱ्या बैठका वेगवेगळ्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या जातात. जो आला नाही, तो नाराज असल्याची चर्चा माध्यमांतून केली जाते.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याद्वारे सरकारच्या समन्वयाचा ठाम संदेश दिला आणि विरोधकांना चांगली टीका करता येत नसल्याचा टोला लगावला. “माध्यमांना क्वालिटीच्या बातम्या सापडत नाहीत, म्हणूनच विरोधकांना तटस्थ टीका करता येत नाही,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील काळात या सर्व मुद्द्यांवर अधिक चर्चा होईल, असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here