शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगारात मोठी वाढ होणार

0
178

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षक वर्गाच्या पगारात लक्षणीय वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारकडून वेतन आयोगाला मंजुरी

केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी मंजुरी दिली आहे. येत्या काही महिन्यांत ही समिती अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्याची परंपरा कायम ठेवत, 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार फायदा

केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळेल. राज्य सरकारकडून 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू केला जाण्याची शक्यता असून त्यानुसार शासकीय सेवेत कार्यरत शिक्षकांच्या पगारात वाढ होणार आहे.

फिटमेंट फॅक्टरमुळे वाढीचा अंदाज

जाणकारांच्या मते, आठव्या वेतन आयोगात 2.0 फिटमेंट फॅक्टर लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

शिक्षकांचा पगार किती होणार?

प्राथमिक शिक्षक – सध्या: ₹29,200/- नवीन अंदाजित मूळ पगार: ₹34,200/-माध्यमिक शिक्षक –सध्या: ₹34,000 ते ₹37,000 (सरासरी) नवीन मूळ पगार: ₹40,800/-उच्च माध्यमिक शिक्षक – सध्या: ₹42,000 ते ₹45,000 (सरासरी) नवीन मूळ पगार: ₹50,700/-

या बदलामुळे राज्यातील शिक्षकवर्गाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, त्यांच्या सेवेला योग्य मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे. आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा आणि राज्य सरकारचा निर्णय याकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here