आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

0
101

अहिल्यानगर : आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम इथून ते नागरकुरलूनकडे जात होते. त्यावेळी यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते, त्या गाडीला बसने जोरदा धडक दिली, त्यामुळे हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये दुखाः चे वातावरण आहे.

सुधाकर पठारे हे सध्या मुंबई पोलिसमध्ये कार्यरत होते. त्यांच्यावर पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी होती. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेले होते, त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ते देव दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळीच हा अपघात झाला, या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना समजली, त्यानंतर ते घटनास्थळी धावत गेले. त्यानंतर झालेल्या अपघाताची बातमी मुंबई पोलिसांना कळवण्यात आली आहे.

सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील बाळवणेचे रहिवाशी होते, पारनेर हा त्यांचा तालुका होता. आयपीएस होण्याअगोदर ते सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अॅग्री, एलएलबी असे होते. स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले होते. यानंतर १९९६ साली विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून त्यांची निवड झाली होती. १९९८ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर ते पोलिस खात्यातच रमले होते. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा या ठिकाणी काम केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here