अहिल्यानगरमध्ये स्वच्छतेचा नवा अध्याय; 65 आठवडे यशस्वी स्वच्छता मोहीम

0
91

अहिल्यानगर : शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारी स्वच्छता मोहीम शनिवार, 22 मार्च रोजी चांदणी चौक ते कोठी चौक या परिसरात यशस्वीरीत्या पार पडली. स्वच्छता विशेष मोहिमे अंतर्गत जेसीबी, ट्रॅक्टर, जेटिंग मशीन सहाय्याने दुभाजका जवळील माती, प्लॅस्टिक कचरा तसेच गटारींमध्ये साचलेला कचरा पूर्णपणे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांसह विविध सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, तसेच व्यापारी संघटनांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

आयुक्तांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मोहीम सतत 65 आठवड्यांपासून सुरू महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम आजपर्यंत सलग 65 आठवडे सातत्याने राबविली जात आहे. दर शनिवारी शहरातील विविध भागांमध्ये ही मोहीम हाती घेतली जाते, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहण्यास मदत होत आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांना आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here