कबर काढण्यास विरोध करणार्यांना दिला सल्ला
अहिल्यानगर – औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे पाडली. हिंदू संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला. त्यामुळे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याबाबत जनतेच्या भावनेचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली.
पालकमंत्री विखे यांच्या हस्ते जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने नगरच्या तांबटकर मळा येथे आयोजित विभागीय साईज्योती सरस 2025 या महोत्सवाचे उदघाटन झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी मंत्री विखे म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीबाबत कोण काय म्हणते, यापेक्षा जनभावना ही महत्त्वाची आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे काय म्हणतात. हे महत्वाचे नाही. काहीजण इतिहासाची माहिती होण्यासाठी औरंगजेबाची कबर आवश्यक आहे, असे म्हणतात. परंतु, त्यांनी तरी इतिहास वाचला आहे का? त्यांनी इतिहास वाचला असता तर औरंगाजेबाने सत्ताकाळात किती त्रास जनतेला दिला, हे समजले असते.
इतिहासाची माहिती होण्यासाठी कबर असणे हे महत्वाचे नाही. सुपा एमआयडीसीमधील वातावरणाबाबत खासदार नीलेश लंके यांनी नाव घेऊन बोलावे? असे जाहीर आव्हान दिले होते. आपण संबंधितांशी दोन हात करण्यास तयार आहोत ? या खासदार लंकेंच्या आव्हानावर मंत्री विखे यांनी हा विषय फार शुल्क आहे. या विषयावर आपण बोलणे संयुक्तिक ठरणार नाही.








