लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र, जूनपासून लाभ बंद

0
131

मुंबई : राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केली आहे. जून महिन्यात 2.25 कोटी पात्र लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याचवेळी एकूण 26.34 लाख महिलांना तात्पुरत्या स्वरुपात अपात्र करण्यात आले आहे.

जून महिन्यात सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तर जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यानंतर 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

जे पात्र त्यांनाच लाभ

तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख एवढ्या लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई, निर्णय लवकरच

शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here