Shani Shingnapur Temple : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाची आजपासून (दि. 01) अंमलबजावणी करण्यात येत आहे.
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून (दि. 01) ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. भविष्यात शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत ने हा निर्णय घेतला होता.त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे.
अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करतात.अन्न व भेसळ तपासणी अहवालानुसार काही तेलांमध्ये भेसळ आढळल्याने शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे.त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतलाय.शनिशिंगणापूर मंदिराच्या प्रवेश द्वारावरच भक्तांकडील तेलाच्या बाटल्या तपासल्या जात आहेत.ब्रँडेड तेलाच्या निकषामध्ये हे तेल खाद्य तेल असलं पाहिजे, शुद्ध शाकाहारी तेल असावं, मुदत बाह्य तेल नसावे असे निकष लावण्यात आले आहेत.नियमात न बसणारे तेल आढळून आल्यास संबंधित दुकानदारावर करावाई करण्याचा इशारा देण्यात आलाय








