संविधानाचा गळा घोटनारी काँग्रेसच भाजपाविरुद्ध खोटे नॅरेटिव्ह पसरवत आहे : भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते

0
55

अहिल्यानगर : भारतीय जनसंघाचे संस्थापक स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अहिल्यानगर येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करत, “काँग्रेसने संविधानाचा गळा घोटला असून, भाजपाविरोधात खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम काँग्रेस सातत्याने करत आहे,” असा आरोप केला.

कार्यक्रमात बोलताना मोहिते यांनी स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी कलम ३७० हटवण्याच्या लढ्याचे महत्त्व पटवून देत, “एक देश, एक संविधान, एक निशान” या मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा भाजपाने जपला असल्याचे सांगितले. “२०१९ मध्ये कलम ३७० रद्द करून मुखर्जी यांचे स्वप्न भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पूर्ण केले,” असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसवर जोरदार टीका
काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना मोहिते म्हणाले, “काँग्रेसने नेहमी देशाच्या हितापेक्षा आपली राजकीय सत्ता टिकवण्याला प्राधान्य दिले. देशाच्या संविधानाशी खेळ करत त्यांनी जनतेला दिशाभूल करण्याचे काम केले आहे. भाजपाच्या राष्ट्रवादी विचारधारेचा द्वेष करून काँग्रेस सातत्याने खोटे आरोप करत आहे. मात्र जनता सत्य ओळखते आणि भाजपाच्या विकासनितीवर विश्वास ठेवते.”

स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे योगदान
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा भारतात संपूर्ण समावेश व्हावा यासाठी आपले प्राण अर्पण केले. १९५३ मध्ये काश्मीर आंदोलनादरम्यान त्यांचे रहस्यमय मृत्यू झाला. ज्याला भाजप ‘बलिदान’ म्हणून स्मरते. हिंदू हिताचे रक्षण, धार्मिक आणि राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार, आणि देशाच्या औद्योगिक विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here